नुकतीच भारत आणि सिंगापूर यांच्यात गोलमेज परिषदेदरम्यान सेमीकंडक्टर्स, डिजिटल पेमेंट्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील आपली 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' (CSP) अधिक दृढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • भारत आणि सिंगापूर यांच्यात सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या 'भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदे'दरम्यान (India–Singapore Ministerial Roundtable  - ISMR) भारत आणि सिंगापूरने आपली 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' (Comprehensive Strategic Partnership - CSP) अधिक बळकट केली आहे.
  • सेमीकंडक्टर्स, डिजिटल कनेक्टिव्हिटी, फिनटेक, आरोग्यसेवा, हरित अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा आणि प्रगत उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या भागीदारीमध्ये भर देण्यात आला.
  • या गोलमेज परिषदेला दोन्ही देशांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय), एस. जयशंकर (परराष्ट्र व्यवहार मंत्रालय), पीयूष गोयल (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय) आणि राज्यमंत्री जितिन प्रसाद (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) यांचा समावेश होता.
  • सिंगापूरचे संबंधित मंत्रीही यामध्ये सहभागी झाले होते.

भारत-सिंगापूर भागीदारीविषयी थोडक्यात महत्वाचे:

  • नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत आणि सिंगापूरने विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवले आहे.
  • दोन्ही देशांमध्ये सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर्स, आणि अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा संपन्न झाली.